आदर्श पत्नीचे गुण जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले होते

admin

Updated on:

सुखी संसार कसा असावा? एक आदर्श पत्नी म्हणून काय केले पाहिजे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतात. अगदी पूर्वीच्या काळीदेखील असेच प्रश्न लोकांनां पडायचे. माझे म्हणणे आहे महाभारत मधील द्रौपदी आपल्या सर्वांना माहीतच असेल. तिने श्रीकृष्णाच्या बायकोला म्हणजेच सत्यभामेला सुखी संसाराचे रहस्य सांगितलेले.

या लेखात पाहू आदर्श पत्नीचे गुण जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले होते.  

द्रौपदी जी पाच पांडवांची पत्नी होती. तिने आदर्श पत्नीचे गुण सत्यभामेला म्हणजेच श्री कृष्णाच्या बायकोला सांगितलेले. ते आदर्श पत्नीचे गुण नेमके काय आहेत? ते आपण पाहू. पण त्या आधी द्रौपदी बद्दल थोडी माहिती पाहूया. 

द्रौपदीला अनेक नावांनी ओळखले जात होते ते म्हणजे खालील प्रमाणे  :

  • पांचाली (पांचाल राज्याच्या राजाची कन्या )
  • याज्ञसेनी (यज्ञातून किंवा होमातून जन्माला आलेली अशी)
  • महाभारती (भारताच्या ५ वंशजांची पत्नी असलेली )
  • सैरंध्री (एक कुशल मोलकरीण होती. तिने अज्ञातवासात हे नाव घेतलेलं, ज्या काळात ती विराट राज्याची राणी सुदेषणा हिची केश रचनाकार म्हणून होती)

द्रौपदीचे वडील द्रुपद जे कि पांचाल या देशाचे राजा होते, त्यांनी द्रौपदीची निर्मिती केवळ कुरु साम्राज्याचा विध्वंस करण्यासाठी आणि ज्या द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडव सेनेच्या मदतीने पांचाल राज्याचे विभाजन केले, त्या द्रोणाचार्यांचा पराभव करण्यासाठी तिची निर्मिती केली होती. त्यामुळे द्रौपदी कोणत्याही बालपणाशिवाय आणि माता – पित्याच्या प्रेमाशिवाय सरळ एक प्रौढ म्हणून जन्माला आली होती. द्रौपदीचा जन्म हा रागातून झालेला. तसेच एका कुटुंबाचा विनाश करण्यासाठी तिचा जन्म झाला होता.

अजून एक संकल्पना तिच्याशी जोडलेली ती म्हणजे द्रौपदीची थाळी (जेवणाचे ताट) जणू काही लक्ष्मीचे “अक्षय पात्र” जे कि नेहमी अन्न पूर्ण भरलेले , कधीही रिकामे न होणारे न संपणारे . भारतात “द्रौपदीची थाळी” ही संकल्पना म्हणजे एक असे स्वयंपाक गृह जे सदैव पंच पक्वन्नांनी ओसंडून वाहणारे. हे उत्तम गृहिणी असल्याचे लक्षण मानले जात असे (काही ठिकाणी तिला अन्नपूर्णा देखील म्हणत). 

आता पाहू आदर्श पत्नीचे गुण जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले होते

पांडव आणि संत एके दिवशी आश्रमात बसलेले होते. त्यावेळी द्रौपदी आणि सत्यभामा देखील सोबत बसल्या होत्या. त्यावेळी सत्यभामाने द्रौपदीला विचारले- बहीण, तुझे पती पांडव जण तुझ्यावर नेहमी प्रसन्न कसे असतात? ते नेहमी तुझ्या नियंत्रणात कसे असतात? तुझ्यापासून ते समाधानी असतात. मला ही असेच काही सांग ज्याने श्यामसुंदर, श्रीकृष्ण देखील माझ्यावर खूश असतील.

तेव्हा द्रौपदी म्हणाली- सत्यभामा, असे दुराचारिणी स्त्रियां सारखे कसे विचारत आहे. पतीला कळले तर तो कधीच वश मध्ये येणार नाही. तेव्हा सत्यभामाने म्हटले- तर सांग, की तू तुझ्या नवऱ्यानं बरोबर कसा व्यवहार करते?

हा प्रश्न ऐकून द्रौपदी म्हणाली-

१. ऐक, अहंकार, काम, क्रोध सोडून मी सर्व पांडवांची सेवा करते.

२. स्वतःला ईर्ष्यापासून दूर ठेवते . मनावर ताबा ठेवते. कटू भाषणांपासून स्वतःला दूर ठेवते.

३. कोणाच्याही समक्ष स्वतः असभ्यपणे उभी राहत नाही.

४. वाईट भाषण करत नाही आणि वाईट स्थानी बसत नाही.

५. पतीच्या अभिप्रायाला पूर्ण संकेत समजते आणि तसे अनुकरण करते.

६. देव असो, इतर मनुष्य असो , एखादा रूपवान पुरुष असो , माझे मन पांडवांव्यतिरिक्त कुठेच रमत नाही.

७. त्यांचे स्नान झाल्याशिवाय मी स्नान करत नाही तसेच ते बसल्याशिवाय मी बसत नाही.

८. माझे पती घरी आले कि मी घर स्वच्छ ठेवते. त्यांना वेळेवर जेवण देते.

९. मी सदैव सावध असते. घरात गुप्त रूपी धान्य ठेवते.

10. मी दराबाहेर उभी राहत नाही.

11. पतीशिवाय एकटे राहणे मला आवडत नाही.

12. यासोबत सासूने सांगितलेले गोष्टी पाळते.

तर अशा पद्धतीने द्रौपदीने सत्यभाच्या प्रश्नाला उत्तर देऊन सुखी संसाराचा मूलमंत्र किंवा कानमंत्र दिला असे आपण म्हणू शकतो. त्याचा आपल्याला देखील वापर होऊ शकतो किंवा आपण स्त्रिया देखील असेच आचरण करतो असे म्हटले तरी चालेल. तसेच हा सल्ला प्रत्येक युगात लागू होतो. 

Leave a Comment