विठ्ठल आणि रुक्मिणी हे नेमके कोण

admin

Updated on:

महाराष्ट्रात अनेक देवी देवतांचे पूजन केले जाते. वारकरी संप्रदायाचा देखील आराध्य दैवत पांडुरंगआहेत ते पंढरपुरात विराजमान आहेत. हे आपल्या सर्वांना माहीतच असेल. या लेखांमध्ये जाणून घेऊया विठ्ठल आणि रुक्मिणी कोण आहेत?

विठ्ठल आणि रुक्मिणी हे नेमके कोण? यासाठी एक कथा आहे. ती आपण पाहूयात.

कथा:

खूप वर्षांपूर्वी पुंडलिक नावाचा एक विष्णू भक्त होता. तो स्वतःची पत्नी, आई आणि वडील यांसोबत दिंडीर वन नावाच्या जंगलामध्ये राहत असायचा. पुंडलिक सद्गुनी पुत्र होता. पण लग्नानंतर तो आई-वडिलांना चांगले वागवत नव्हता. त्यामुळे आई वडील काशीला जायला निघाले. सोबत पुंडलिक आणि त्याची पत्नी देखील त्यांच्यासमवेत जाण्यास निघाले. जाताना एका आश्रमा जवळ पोहोचले. तिथेच त्यांनी काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला. एकदा पहाटे पुंडलिकाला काही स्त्रिया दिसल्या. त्यांची वस्त्र खूप खराब होते. त्या स्त्रिया आश्रमात आल्या. त्यांनी आश्रम साफ स्वच्छ करून तिथे पाणी आणून ठेवले आणि मग त्या बाहेर गेल्या आणि तिथून अदृश्य झाल्या. असे बरेच वेळा घडले. शेवटी पुंडलिकाने त्यांना त्या कोण आहेत? हे विचारले. त्या म्हणाल्या, की त्या पवित्र नद्या गंगा ,यमुना आहे. ज्या नद्या मध्ये लोक आपली पापी धुतात. म्हणूनच त्यांचे कपडे खराब असतात आणि त्यांनी पुंडलिकाला तुम्हा पापी आहात असे म्हणाल्या. कारण तू तुझ्या आई-वडिलांना वाईट वागणूक देतोस. हे ऐकून पुंडलिकाच्या मध्ये खूप मोठा बदल झाला आणि त्या नंतर तो खूप चांगला व आज्ञाधारक असा पुत्र झाला. आपल्या आई-वडिलांचा तो आदर ठेवू लागला आणि त्यांना विनंती केली की त्यांनी काशीला जाऊ नये आणि पुन्हा आपल्या घरी यावे.

अशीच एके दिवशी भगवान विष्णू एकटे होते आणि त्यांना त्यांचे मथुरेतील दिवस आठवले. त्यात त्यांना गोपिका आणि राधा यांची देखील आठवण आली. राधा मेलेली होती तरी भगवान विष्णूंनी स्वतःच्या शक्तीने तिला पुन्हा जिवंत केले आणि स्वतःजवळ बसविले. त्याच वेळेस रुक्मिणी देखील कक्षामध्ये आली. रुक्मिणीला राधेचा राग आला कारण रुक्मिणी कक्षात आल्यावरती राधा उभी राहिली नाही. तिचा अपमान झाला असे रुक्मिणीला वाटले आणि म्हणून रुक्मिणी रागाने द्वारका सोडली आणि ती देखील दिंडिर वनात आली. इथे भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधासाठी बाहेर पडले. सर्वात आधी मथुरेस गेले. नंतर गोकुळात गेले. त्यांनी खूप शोध घेतला. तिथून मग दिंडीर वन जंगलामध्ये रुक्मिणीच्या शोधामध्ये निघाले. भगवान विष्णूना रुक्मिणी इथे सापडली. त्यांनी तिला शांत केले आणि मग भगवान विष्णू व रुक्मिणी पुंडलिकाच्या आश्रमामध्ये आले. त्यावेळेस पुंडलिक आपल्या आई-वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता. भगवान विष्णूंनी पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिकाला देखील ते कळले की भगवान श्री विष्णू स्वतः आपल्याला भेटायला आले आहे. पण आई-वडिलांच्या सेवेपेक्षा काहीच मोठे नाही असे त्यांनी ठरवले आणि त्याने भेटण्याचे नाकारले आणि एक वीट त्यांच्यासमोर फेकली आणि त्यावरती उभे रहा म्हणून सांगितले. माझ्या आई-वडिलांची सेवा करून झाल्यावर मी तुम्हाला भेटतो. असे पुंडलिकाने भगवंतांना सांगितले. पुंडलिकाची आई वडिलांवरील ही श्रद्धा, आपुलकी पाहून भगवान श्री विष्णू खूप खुश झाले. त्यांनी देखील पुंडलिकाचे ऐकून त्या विटेवरी उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली आणि आई-वडिलांची सेवा करून झाल्यानंतर पुंडलिकाने आपल्या देवाची क्षमा मागितली आणि विनंती केली की समस्त भक्तांसाठी भगवंतांनी इथेच थांबावे आणि म्हणून भगवान श्री विष्णूंनी तसेच पुंडलिकाला वरदान दिले आणि त्यावेळी पासून भगवान विष्णू हे विठ्ठल अवतारामध्ये तिथेच आहेत आणि रुक्मिणी देखील त्यांच्या सोबत आहे.

ही होती कथा विठ्ठल रुक्मिणी यांची. म्हणजेच हे दुसरे तिसरे कोणी नसून आपले भगवान श्री विष्णू व रुक्मिणीच आहेत. हे आता आपल्याला नक्कीच कळले असेल. भगवंताची लीला अगाध आहे. आपण सामान्य मनुष्य ती समजू शकत नाही. 

Leave a Comment