वारी का आणि कशी सुरू झाली?

admin

Updated on:

      वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. आपल्या सर्वांना वारी हा शब्द काही नवीन नाही. आषाढ तसेच कार्तिक या दोन्ही महिन्यांमध्ये जेव्हा एकादशी असते तेव्हा आळंदीवरून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहून वरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून, या दोन्ही पालख्या रथा मधून पंढरपूर येथे जाण्यास सज्ज होतात. एकंदरीत वारकरी संप्रदायासाठी खूप महत्त्वाची अशी ही वारी असते असे आपण म्हटले तरी चालेल.

वारी का आणि कशी सुरू झाली?

     वारीचा सर्वसामान्य अर्थ म्हणजेच पदयात्रा होय आणि जे ही पदयात्रा करतात ते वारकरी असे संबोधले जातात. हे वारकरी स्वतःची ही पदयात्रा पंढरपूर पर्यंत पूर्ण करतात. पांडुरंग म्हणजेच विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णूचा अवतार असलेल्या या देवाकडे हे वारकरी पायी चालत जातात. आता पाहू वारी का आणि कशी सुरू झाली?

       तसे पाहता पंढरीच्या वारीची परंपरा खूप जुनी आहे. पण तेराव्या शतकात देखील ही परंपरा होती असे म्हटले गेले आहे. संत ज्ञानदेवांच्या घराण्यामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा असायची.

संत ज्ञानेश्वरांचे वडील वारीला जात असायचे. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन  या सोहळ्यामध्ये सर्व जातीपातीच्या लोकांना सामावून घेतले होते.

आता याचेच पुढचे स्वरूप एकनाथ महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, या सर्व संतांनी ही परंपरा चालू ठेवली आहे असे म्हणतात. संत तुकाराम महाराजांच्या कुटुंबात देखील वारीची परंपरा होती.

संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे वारीविषयी सांगतात की पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. तसेच ही विठ्ठलाची मनोभावे केलेली उपासना आहे.

समृद्ध परंपरा

       संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या काळापासून महाराष्ट्र मध्ये वारीची समृद्ध परंपरा आहे. आणि त्यांच्या समाधीनंतर देखील त्यांच्या भक्तांनी ही परंपरा अजूनही चालू ठेवली आहे.

संत तुकारामांचे पुत्र नारायण यांनी संत तुकाराम यांच्या पादुका देहू वरून आळंदीला आणल्या. इथून भगवान विठ्ठल यांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जाण्याची सुरुवात केली आणि हे अजूनही पाळले जाते.

यानंतर काही वर्षांनी संत तुकाराम यांच्या वंशजा मध्ये ताफावत निर्माण झाली आणि मग ज्ञानेश्वरांची वेगळी पालखी सुरू करण्यात आली.

अजूनही या दोन्ही पालख्या म्हणजेच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या  पंढरीच्या दिशेने जातात. त्यांचे मार्ग देखील वेगळे आहेत. पण वारी या एका पदयात्रेने असंख्य असे भक्त, भगवंताच्या नामात तल्लीन होऊन पंढरपूर पर्यंत पायी प्रवास करतात. स्वतःतील सर्व भेद बाजूला सारून केवळ विठ्ठलाच्या नामामध्ये स्वतःला झोकून देऊन, त्याच्या गजरामध्ये, ब्रह्मानंदी टाळी लागते आणि त्या विठुरायाची भेट घेण्यासाठी हे आसुसलेले भक्तगण पंढरपूर पर्यंत कशाचीही पर्वा न करता प्रवास करतात.

पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य

    या वारीचे म्हणजेच पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर ते म्हणजे रिंगण आणि धावा. 

रिंगण म्हणजे वेळापूर, वाखरी कडूस फाटा या ठिकाणी रिंगण होते. ही एक पवित्र गोष्ट आहे.

मोकळ्या मैदानात वारकरी हात धरून गोलाकार उभे असतात आणि या मोकळ्या जागेत ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धाव घेतो. यालाच माऊलीचा अश्व असे संबोधतात आणि या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत अशी वारकऱ्यांची समजूत आहे.

त्यानंतर धावा म्हणजे शब्दशः अर्थ धावणे होय. संत तुकाराम महाराजांना वेळापुर येथील टेकडी वरती विठ्ठलाच्या देवळाचे, त्याच्या कळसाचे दर्शन घडले आणि पायी जात असताना तो कळस पाहून विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने तिथून त्यांनी पंढरपूर पर्यंत धाव घेतली आणि म्हणून वारकरी देखील वेळापूर पासून पंढरपूर पर्यंत धावत जातात.

आषाढी वारी आणि कार्तिकी वारी

     तर अशीही वारकऱ्यांची वारी जी दोन वेळा होते. एकदा आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. अनेकदा विठ्ठलाच्या आरती मध्ये देखील या वारीचा उल्लेख आपल्याला ऐकायला मिळतो. प्रसार माध्यमातून आपण वारीचे व्यापक स्वरूप पाहत असतो. विठुरायाच्या दर्शनाला आपण स्वतः वारीतून जाऊ शकत नाही. पण मनोमन त्या भगवंताला प्रार्थना करून त्याच्या आशीर्वाद नक्कीच घेऊ शकतो.

Leave a Comment