वारकरी आणि वारी एक वेगळेच समीकरण. आषाढ महिना लागताच वारकर्यांना वेध लागतात ते म्हणजे वारीचे. तसे पाहता दोन वाऱ्या प्रामुख्याने केल्या जातात. त्या म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. पण त्यात देखील आषाढी वारीस खूप महत्व आहे. या वारीस वारकरी त्यांच्या लाडक्या विठोबासी भेटायला पायी प्रवास करतात. ते सुद्धा पंढरपूर पर्यंत. कशाची हि तमा न बाळगता, थांबून. विसावा घेऊन पुन्हा प्रवास सुरु करतात. हरिनामाच्या गजरात, राम कृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम असे म्हणत. दिंड्या आणि पताका घेऊन वारी पंढरपूरला पोंहचते. चंद्रभागेमधे आधी अंघोळ करतात आणि मग विठुरायाचे दर्शन घेतात. एवढा पायी प्रवास करून देखील त्यांच्या चेहरयावर थकवा अजिबात जाणवत नाही आणि विठ्ठलाच्या दर्शनाने तर अजून उत्साह संचारतो असे म्हटले तरी चालेल.
चला तर पाहूया आषाढी एकादशीला एवढे महत्व का? आणि हि आषाढी एकादशी का साजरी करतात?
अजून एक महत्वाचे म्हणजे जे वारकरी वरील जाऊ शकत नाही ते आषाढी एकादशीचा उपवास करतात. अगदी वारकरीच कशाला इतर समाजाची मंडळी, लहान मुले, देखील हा उपवास करतात. हरीचा जप करतात. विठ्ठलाचा जप करतात. कारण श्री कृष्ण आणि विठ्ठल एकच आहेत. १४ एकादशीमधून फक्त आषाढी एकादशीलाच एव्हढे महत्व आहे. त्यामागे एक कथा आहे ती आपण पाहूया.
आषाढी एकादशीची कथा:
कुंभ दैत्याचा मृदू मान्य नावाचा एक पुत्र होता. त्याने भगवान शंकर यांना प्रसन्न करून एक वरदान प्राप्त करतो, ते म्हणजे तो कधीच मरणार नाही असे हे अमरत्वाचे वरदान. त्यात पण भगवान शंकर त्याला हे सांगतात की, तू एका स्त्रीच्या हातून मात्र नक्की मरशील. अशा या असुराला नेमके हरवायचे कसे? असा प्रश्न सर्व देवांना पडतो आणि त्यात भगवान शंकर मदत करण्यास नकार देतात. घाबरून सर्वदेव चित्रकूट पर्वतावरती एका गुहेमध्ये लपून राहतात. त्यावेळी नेमकी आषाढी एकादशी होती आणि पाऊसही पडत असल्यामुळे या पावसात सर्व देवांचे स्नान होते. सकाळपासून त्यांनी काहीही खाल्ले नव्हते त्यामुळे आषाढी एकादशीचा उपवास देखील त्यांचा घडला. सर्व देव एकत्र होते आणि त्यांच्या त्या एकत्रित श्वासामधून एक शक्ती तयार झाली आणि या शक्तीने त्या मृदू मान्य असुराचा वध केला आणि सर्व देवांची सुटका केली. याच शक्तीला एकादशी देवता असे म्हणतात.
अजून मान्यता अशी कि या आषाढी एकादशी पासून देव झोपी जातात आणि चातुर्मासा पर्यंत ते जागे होत नाहीत. त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी देखील असे म्हणतात. देव जेव्हा झोपलेले असतात. त्यात असुर शक्ती जास्त त्रास देतात. त्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून आपण काहीतरी उपासना केली पाहिजे. त्याने आपल्याला बळ मिळेल आणि म्हणूनच वारकरी वारी करतात आणि हरिनामाच्या जयघोषात आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचतात. तिथे देखील विधीवत विठ्ठलाची पूजा होते आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा घेतात आणि विठ्ठलाच्या भक्तीत लीन होतात.
आषाढ महिन्यात पचन शक्तीत बिघाड होतो. म्हणून चार्तुमासात अनेक व्रत, वैकल्य आणि उपवास दिले आहेत. त्याने आपण आपली प्रकृती सांभाळू शकतो.
तर अशा पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करण्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत.
आषाढी एकादशी व्रताचे जर कोणाला आचरण करायचे असेल किंवा उपवास करायचा असेल तर स्नान करून हरीची किंवा विठ्ठलाची पूजा करावी आणि शक्यतो उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडवा. तर ज्यांना कोणाला आषाढी वारीला जाता येत नाही किंवा पंढरपूरला जाता येत नाही. त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास करावा. जर काहींना उपवास देखील जमत नसेल तर पूजा करावी. भगवान विष्णूची किंवा विठ्ठलाची जप करावे, नामस्मरण करावे. ते देखील खूप होईल तर अशी हि आषाढी एकादशी सर्व महाराष्ट्रात साजरी केली जाते आणि आता नक्की कळले असेल हि का साजरी करतात ते?